Belagavi

राहुल जारकीहोळी यांच्या उमेदवारीवर अद्याप चर्चा नाही : सतीश जारकीहोळी

Share

मंत्रिमंडळात रिक्त असलेली दोन पदे वाल्मीकी समाजाला मिळावीत, यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे मागणी करण्यात येणार असल्याचे बेळगाव जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

डीसीसी बँकेच्या निवडणुकीत राहुल जारकीहोळी यांच्या सहभागाबाबत सर्व प्रमुख नेत्यांशी विचारविनिमय करून पुढील दहा दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. या निवडणुकीत ४ ते ५ जागांसाठी निवडणूक होऊ शकते, तर एकूण सुमारे १० ठिकाणी मतदान होण्याची शक्यता आहे, असे संकेत सतीश जारकीहोळी यांनी दिले.

काही दिवसांपूर्वी राजण्णा यांनी ‘मुख्यमंत्री सिद्धरामय्या पूर्वीप्रमाणे चंचल आणि उत्साही नाहीत’ अशा आशयाचे विधान केले होते. या विधानावर बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले की, “याबद्दल तुम्ही राजण्णा त्यानंच विचारले पाहिजे.” मुख्यमंत्री स्वतःच पुढील अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचे सांगितल्यामुळे आता या विषयावरील गोंधळ संपुष्टात आला आहे. मात्र, अंतिम निर्णय काँग्रेसच्या हाय कमांडने घेणे अपेक्षित आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

बेंगळुरू येथे उद्या, वाल्मीकी जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मंत्रिमंडळात रिक्त असलेली दोन्ही पदे वाल्मीकी समाजातील प्रतिनिधींना देण्याची जोरदार मागणी करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Tags: