Chikkodi

‘डिसिसी बँक निवडणुकीसाठी जिल्हा नेत्यांच्या निर्णयाला बांधील’ : राहुल जारकीहोळी

Share

डिसिसी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत रिंगणात उतरण्याबाबत आपण जिल्ह्यातील नेत्यांच्या निर्णयाला बांधील राहू, असे युवक काँग्रेसचे नेते राहुल जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

चिकोडी शहरातील खासदारांच्या कार्यालयात प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, अद्याप नामांकन प्रक्रिया सुरू झालेली नाही. “वडील सतीश जारकीहोळी आणि जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नेते एकत्र चर्चा करतील आणि ते जो निर्णय घेतील, तो निर्णय मला मान्य असेल आणि मी त्याचे पालन करीन,” असे त्यांनी सांगितले.

Tags: