Belagavi

द्विशतकी परंपरा लाभलेला श्री लक्ष्मी वेंकटेश रथोत्सव भक्तिमय वातावरणात

Share

विजयादशमी निमित्त बेळगाव आणि शहापूरच्या दोनशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.

बेळगाव आणि शहापूर येथील श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानाकडून या रथोत्सवाला प्रारंभ झाला. शेकडो भक्त या रथोत्सवात सहभागी झाले होते. ‘वेंकट रमण गोविंदा, गोविंदा’ असा जयघोष करत भक्तांनी रथ ओढला. रथाच्या मार्गांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

ठिकठिकाणी सुवासिनी रथाला आरती करत होत्या, तर रथोत्सवाच्या वेळी भक्तांना प्रसादाचे वितरण करण्यात येत होते. भक्तांकडून खोबरे, खारीक आणि केळ्याची उधळण करण्यात येत होती, तसेच रथाच्या मार्गांवर रथावर फुलांची उधळण होत होती. शहरातील विविध मार्गांवरून मिरवणूक काढल्यानंतर या रथोत्सवाची श्री लक्ष्मी वेंकटेश देवस्थानाकडे सांगता झाली.

Tags: