Belagavi

बेळगावात श्री दुर्गामाता दौडीचा दहावा दिवस उत्साहात

Share

बेळगावात नवदुर्गेच्या आराधनेसोबतच श्री दुर्गा माता दौड उत्साहात संपन्न झाली. आज या दौडीचे दहावे पुष्प अत्यंत उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडले.

सोमनाथ मंदिरापासून सुरू झालेली ही दौड फूलबाग गल्ली, पाटील गल्ली, शनी मंदिर रस्ता, मठ गल्ली, कलमठ रस्ता, अनंतशयन गल्ली, टिळक चौक, रिझ टॉकीज रस्ता, कोनवाळ गल्ली, अनुपम हॉटेल रस्ता, कुलकर्णी गल्ली, शेरी गल्ली, शिवाजी रस्ता, मुजावर गल्ली, कांगळी गल्ली, स्टेशन रस्ता, पाटील गल्ली, फूलबाग गल्ली या रस्त्यांवरून संचारली. या वेळी प्रत्येक गल्लीतून दौडचे उत्साहाने स्वागत करण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून बेळगावात दरवर्षी सातत्याने संभाजी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली श्री दुर्गामाता दौड आयोजित केली जाते. अलीकडे राष्ट्र आणि हिंदू धर्मावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हिंदू धर्माची जागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. लहानपणापासूनच मुलांना या दौडमध्ये सहभागी करून घेतल्यास, त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागृत होते. ही दौड केवळ एक धाव नसून, शारीरिक सक्षमतेचा व्यायामदेखील आहे, असे मत शिवभक्त धारकरी मेघना तारिहाळकर यांनी व्यक्त केले.

या वेळी दौडमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी आणि गल्लीतील भक्तांनी सांगितले की, मुलांमध्ये देव, देश आणि धर्म याची जागृती व्हावी, यासाठी त्यांना दौडमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त केले जाते.

दौड तासिलदार गल्ली, पाटील मळा, भांदूर गल्ली, फूलबाग गल्ली, उषा ताई गोगटे हायस्कूल, स्टेशन रोड मार्गे जात शनी मंदिराजवळ समाप्त झाली. गुरुवारी मारुती गल्लीतील श्री मारुती मंदिरातून ही दौड सुरू होईल आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौकात या दौडीच्या पुष्पाची सांगता होईल.

Tags: