Chikkodi

सनातन धर्म भारताचा मूळ धर्म : बसनगौडा पाटील यत्नाळ

Share

सनातन धर्म हा भारताचा मूळ धर्म आहे. प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन करावे आणि आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केले.

चिकोडी तालुक्यातील मांजरी गावात नवरात्री निमित्त नारवीर तानाजी युवक मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

सनातन धर्म हा भारतातील सर्वात प्राचीन धर्म असून, सौदी अरेबियासारख्या देशांतही आता मंदिरे उभारली जात असताना, भारतात मात्र मंदिरांवर दगडफेक होतेय, अशी टीका आमदार यत्नाळ यांनी केली. राज्य सरकार या घटनांकडे दुर्लक्ष करून इतर धर्मांना प्राधान्य देत आहे, परंतु मंदिरांना निधी पुरवत नाही, ही दुःखद बाब आहे. त्यांनी मंदिरांच्या जमिनींवरील अतिक्रमण आणि हिंदू धर्माविरुद्ध चाललेल्या षडयंत्राबद्दल चिंता व्यक्त केली. धर्म, संस्कृती आणि मंदिरांचे संरक्षण करण्यासाठी जागरूकता आवश्यक असून, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राजमाता अहिल्याबाई होळकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या कार्याचा परिचय सर्वांना होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. सनातन, जैन, बौद्ध, लिंगायत या मूळ धर्मांच्या संरक्षणासाठी नवरात्रीत असे कार्यक्रम राबवणे कौतुकास्पद आहे, असे मत त्यांनी मांडले.

या वेळी श्रीमंत महादिराजा शितोळे सरकार अंकलीकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. श्रीपाद गिरी महाराज आणि शशिकांत पडळगी यांच्या दिव्यसानिध्यात हा कार्यक्रम पार पडला.

Tags: