बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथे रस्ते विकासासाठी दक्षिण बेळगावचे आमदार अभय पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. आमदारांच्या या भूमिकेमुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथील सुमारे १३ ते १४ वर्षांपूर्वी बांधलेले रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यांच्या विकासासाठी आमदार अभय पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. आज त्यांनी येळ्ळूरला भेट देऊन रस्त्यांच्या सध्याच्या स्थितीचे अवलोकन केले. त्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावात २००८ मध्ये, जेव्हा मी पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो होतो, तेव्हा हे रस्ते बांधले होते. सुमारे १३ ते १४ वर्षांनंतर हे रस्ते खराब झाले आहेत. आता ते पुन्हा विकसित केले जातील. या भागातील लोकांनी जास्त मते दिली नसली तरी, विकास हेच धोरण मानून जात, धर्म, भाषा याचा भेदभाव विसरून काम केले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी येळ्ळूरचे ग्रामस्थ आणि इतर नागरिक उपस्थित होते.


Recent Comments