Belagavi

बेळगाव श्री दुर्गामाता दौडीचे दहावे पुष्प जल्लोषात

Share

राष्ट्रमता जिजाऊ यांचे वडील लखोजीराव जाधव यांचे १६ वे वंशज श्रीमंतराजे अमरसिंह उदयसिंग जाधव यांनी हिंदू धर्म आणि देशाच्या संरक्षणासाठी सर्व नागरिकांनी आपल्या जात-पात आणि मतभेदांना बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

आज बेळगाव येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या १०व्या दिवसाच्या श्री दुर्गामाता दौडमध्ये सहभागी झाल्यानंतर समारंभात बोलताना श्रीमंतराजे अमरसिंह उदयसिंग जाधव यांनी हे मत व्यक्त केले. बेळगावात हिंदू धर्माच्या जागृतीसाठी सर्व मतभेद बाजूला ठेवून मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले आहेत, ही बाब अत्यंत प्रशंसनीय आहे. कर्नाटकांशी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपले संबंध आहेत. रक्तसंबंधांपेक्षाही उत्तम विचारांचे नातं हे अत्यंत श्रेष्ठ असते, अशा शब्दांत त्यांनी आपला विचार मांडला.

या वेळी किरण गावडे, गजानन पवार यांच्यासह अन्य मान्यवर सहभागी झाले होते.

Tags: