
आज सकाळी पहाटे साडेपाच वाजता शाहूनगर, बेळगाव येथे बीके कंग्राळी येथील श्री दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहाने पार पडली. शाहूनगर भागातील सर्व गल्ल्यांमध्ये जाऊन ही दौड काढण्यात आली.

ज्यामध्ये नागरिक, महिला आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या दौडीमध्ये समाजसेवक प्रवीण पाटील यांनी दुर्गामातेचा ध्वज घेऊन उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी बेळगावच्या माजी उपमहापौर व नगरसेविका रेश्मा प्रवीण पाटील, नगरसेवक श्रेयस नाकाडी, माजी नगरसेवक मोहन बेळगुंदकर, तसेच रोहित जांभळे, रवी, आदित्य पाटील, निरंजन जाधव, शाश्वत कांबळे, ज्योती होसुरकर, राजश्री राऊत, पल्लवी प्रभाकर आणि युवक व महिला मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दौड मार्गावर महिलांनी आपल्या अंगणात सुंदर रांगोळ्या आणि फुलांची सजावट करून या दौडीचे उत्साहाने स्वागत केले.


Recent Comments