Belagavi

हिंदीसक्ती विरोधात आंदोलन करणाऱ्या करवे कार्यकर्त्यांना तात्काळ मुक्त करा

Share

केंद्रीय अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या हिंदीच्या सक्तीला विरोध दर्शवण्यासाठी बेंगळुरू येथे हिंदी फलक फाडून आणि हिंदी लादण्यासंबंधीची बैठक उधळून आंदोलन करणाऱ्या कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना त्वरित सोडावे, या मागणीसाठी आज बेळगाव येथे करवेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

बेंगळुरूमध्ये हिंदीचे फलक फाडून आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी आयोजित केलेली हिंदी सक्तीची बैठक उधळून आंदोलन करणाऱ्या करवेच्या कार्यकर्त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करत आज बेळगावमध्ये करवेने आंदोलन केले.

यावेळी बोलताना आंदोलकांनी हिंदी सक्ती विरोधात बेंगळुरू येथे झालेल्या आंदोलनात हिंदी फलक फाडून विरोध करणाऱ्या कन्नड कार्यकर्त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्याचे काम करणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लाज वाटायला हवी, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकारने तात्काळ सर्व कार्यकर्त्यांना मुक्त करावे. अन्यथा, संपूर्ण कर्नाटकात याचे मोठे उद्रेक होतील, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी दीपक गुडगनट्टी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने प्रादेशिक राज्यांमध्ये अधिकाऱ्यांवर सक्तीने हिंदी लादली आहे. याला विरोध करत असताना राज्य सरकारने करवेच्या कार्यकर्त्यांनाच अटक करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या दुजाभाव करत आहेत, असे त्यांनी म्हटले.

Tags: