Vijayapura

मुसळधार पावसाच्या प्रकोपाने विजापूर जिल्ह्यातील देवणगाव जलमय

Share

विजापूर जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत असून आलमेल तालुक्यामधील देवणगाव पूर्णपणे जलमय झाले आहे. संततधार पावसामुळे भीमा नदीला पूर आल्याने नदीचे पाणी गावात शिरल्यामुळे संपूर्ण गाव पाण्याखाली गेले आहे.

गावातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे ग्रामस्थांना शासकीय मदत केंद्रात आश्रय घ्यावा लागला आहे.

शुक्रवारी सायंकाळी तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांनी या पूरग्रस्त गावाला भेट दिली. मदत केंद्रात ग्रामस्थांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून सर्व आवश्यक व्यवस्था पुरवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Tags: