दसरा म्हटला की, सहसा म्हैसूरची आठवण होते, पण राज्याच्या उत्तर भागातही माता चामुंडेश्वरी वास करते. या पवित्र स्थानी महानवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.पाहुयात अथणी येथील चामुंडेश्वरी मंदिराच्या दसरा उत्सवाचा आढावा..

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात असलेल्या सत्ती गावात माता चामुंडेश्वरी देवीच्या मंदिरात महानवमीचा उत्सव सुरू आहे. दररोज हजारो सुवासिनींची ओटी भरण्याचा हा सोहळा भक्तीच्या परमोच्चतेला पोचल्याचे सिद्ध करत आहे.
गेल्या चार दशकांपासून कृष्णा नदीच्या काठी वसलेले माता चामुंडेश्वरीचे मंदिर आता विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. मिनी अंबारी, माता चामुंडेश्वरीची भव्य मूर्ती आणि नऊ दिवस चालणारे विशेष धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे उत्तर कर्नाटकातील लोकांना म्हैसूर दसऱ्याएवढीच या उत्सवाची भव्यता अनुभवायला मिळते. हे मंदिर आता एक शक्तीपीठ म्हणून लक्ष वेधून घेत आहे.
यावेळी एका स्थानिक भक्ताने प्रतिक्रिया व्यक्त केली. कस्तुरी या स्थानिक रहिवासी भक्तांनी आपली भावना व्यक्त केली. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
मंदिराचे पुजारी शोभा यांनीही उत्सवाच्या आयोजनाबद्दल माहिती दिली. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.


Recent Comments