Vijayapura

विजापूर : डोणी नदीत दुचाकीस्वार वाहून गेला; शोध मोहीम सुरूच

Share

विजापूर जिल्ह्यातील तालिकोटी शहराच्या जवळ, डोणी नदीला आलेल्या पुराच्या पुलावरून दुचाकी घेऊन जात असताना एक दुचाकीस्वार पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. महांतेश होसगौड (वय २०) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालिकोटी जवळील डोणी नदीला पूर आला असून, त्यामुळे या मार्गावरील रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. याच वेळी महांतेश आणि संतोष हडपद (वय ३२) हे दोघे तालिकोटी येथून वडवडगी गावी जाण्यासाठी पुलावरून जाण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली. यावेळी संतोष हडपद यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवण्यात यश मिळवले आहे, मात्र महांतेश यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम अजूनही सुरू आहे.

या दोघांना पाण्यात वाहून जातानाचे दृश्य स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केले आहे. ही घटना ताळीकोट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. घटनेची माहिती मिळताच ताळीकोट तहसीलदार विनय हूगार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

Tags: