मोबाईल टॉवरमधील रेडिओ हेड चोरी करणाऱ्या तीन आंतरराज्यीय चोरट्यांना अटक करण्यात धारवाड ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवानंद कमतगी यांच्या नेतृत्वाखालील पथकाला यश आले आहे.

गेल्या २३ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास धारवाड तालुक्यातील येलिकोप्पा गावातील बसप्पा सूर्यवंशी यांच्या शेतातील मोबाईल टॉवरमधील ४ रेडिओ हेड चोरीला गेल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून तीन लाख दहा हजार रुपये किमतीचे ४ रेडिओ हेड आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेऊन तिन्ही आंतरराज्यीय चोरट्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले असून, त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.


Recent Comments