Belagavi

बेळगावात कन्नड साहित्य मंडळाचे उद्घाटन

Share

बेळगावातील ‘मी आणि आम्ही’ फाउंडेशनच्या वतीने नानू नम्मवरु साहित्य बळग अर्थात ‘मी आणि आम्ही साहित्य मंडळ’ चे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. या कार्यक्रमात डॉ. एम.एस. आशादेवी यांच्यासोबत संवाद आणि विविध पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

बेळगावातीलया साहित्य मंडळाचा उद्घाटन सोहळा, डॉ. एम.एस. आशादेवी यांच्यासहित संवाद आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. एम.एस. आशादेवी, इंदिरा मोटेबिन्नूर, प्रभात पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद सर्वमंगला अरळिमट्टी यांनी भूषविले. यावेळी कन्नड कविता संग्रह आणि ‘तमसोमा ज्योतिर्गमय’ हा कथा संग्रह प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी विद्या हुंडेकर, ज्योती बदामी, डॉ. शोभा नायक, भाग्यश्री भैरप्पण्णवर, सुनंदा एम्मी, विजयलक्ष्मी पाटील, हेमा भरभरी, सुनीता पाटील, सुमा कित्तूर यांच्यासह अनेक साहित्यिक उपस्थित होते.

Tags: