बेळगावातील टिळकवाडी परिसरात कार-बाइकच्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करून बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले आहे.

बेळगावच्या टिळकवाडी परिसरातील काँग्रेस रोडवर असलेल्या अरुण थिएटरसमोर काल सायंकाळी एक भीषण अपघात घडला. एका कार आणि बाइकची धडक झाल्याने बाइकवरील व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. जखमी व्यक्तीचे नाव दादासाहेब पाटील (रा. सिंडिकेट बँक कॉलनी, गणेशपूर) असे आहे. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, फ्रॅक्चर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर आणि भारतीय सेनेतील निवृत्त सुभेदार सुधाकर चाळके यांनी तात्काळ धाव घेतली आणि जखमी व्यक्तीला मदत केली. त्यांच्या वेळेवर केलेल्या मदतीमुळे दादासाहेब पाटील यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे जखमी व्यक्तीचे प्राण वाचले, असे म्हटले जात आहे.


Recent Comments