बेळगावचे डॉ. शैलेंद्र मुतगेकर यांना १२व्या पश्चिम विभागीय नेमबाजी स्पर्धेत दोन कांस्यपदके मिळाली आहेत.

मध्यप्रदेशच्या भोपाळ येथे १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान झालेल्या १२व्या पश्चिम विभागीय शूटगन स्पर्धेत बेळगावच्या कणबर्गी येथील डॉ. शैलेंद्र भीमराव मुतगेकर यांनी दोन कांस्यपदके जिंकत मोठे यश मिळवले आहे. त्यांनी ट्रॅप शूटिंग आणि डबल ट्रॅप शूटिंग या दोन्ही स्पर्धांमध्ये ही पदके पटकावली आहेत. या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शूटगन शूटिंगमध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणारे डॉ. शैलेंद्र मुतगेकर हे बेळगावचे पहिले खेळाडू ठरले आहेत. त्यांचे हे यश तरुण नेमबाजांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.


Recent Comments