आमदार अभय पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे बेळगाव दक्षिण मतदारसंघातील चर्म कारागिरांना ‘पादुका कुटीर’चे वाटप करण्यात आले. समाज कल्याण विभागाच्या ‘डॉ. बाबू जगजीवनराम चर्म उद्योग विकास महामंडळ, कर्नाटक सरकार’ यांच्या उद्यम योजनेअंतर्गत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, बेळगाव दक्षिणमध्ये चर्मोद्योगात कार्यरत असलेल्या सुमारे २० लोकांना सौर पॅनेलसह पंख्यांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे त्यांचे काम अधिक सुलभ होईल. ते म्हणाले की, या योजनेमुळे त्यांच्या मुलांना भविष्यात शिक्षणासाठी मदत होईल. अनेक लाभार्थी या कार्यक्रमात उपस्थित होते.


Recent Comments