सध्याच्या धावपळीच्या जीवनात नियमित योगाभ्यास केल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. म्हणूनच, सर्व वयोगटातील लोकांनी योगा आणि सकस आहाराचा अवलंब केल्यास रोगांपासून मुक्ती मिळते, असे प्रतिपादन देवेंद्र जिनगौडा स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गोपाळ जिनगौडा यांनी केले.

शिंदोळी देवेंद्रनगर येथील देवेंद्र जिनगौडा स्कूल येथे विद्याभारती कर्नाटकतर्फे आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय योगा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र जिनगौडा संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळ जिनगौडा, संस्थेचे सचिव कुंतीसागर हारर्दि, विद्याभारतीचे राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सहसचिव सुजाता दप्तरदार, जिल्हाध्यक्ष-उपाध्यक्ष रामनाथ नाईक, संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, देवेंद्र जिनगौडा शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी पाटील, योगप्रमुख वीरेश प्रसादीमठ, विद्याभारतीचे जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील आणि योगा स्पर्धा सचिव प्रशांत वांडकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ओंकार, सरस्वती, भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रारंभी, विजयालक्ष्मी पाटील यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. परमेश्वर हेगडे यांनी विद्याभारती राज्य संघटनेने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती दिली. योगशिक्षक वीरेश प्रसादीमठ यांनी स्पर्धेचे आधुनिक नियम शिक्षकांना समजावून सांगितले.
या वेळी पंच म्हणून काम करणारे श्रीशैल गोपशेट्टी, डॉ. आरती संकेश्वरी, अशोक संकण्णावर, संजीव बेळीकुष्टी, विश्वनाथ मनगुतकर, श्रीधर प्रभू, राजेश्वरी भंडारी आणि राघवेंद्र बंडीवडर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उदय संकण्णावर, कृष्णा, अनुराधा पुरी, ओंकार गावडे, श्रीकांत कांबळे यांच्यासह विविध जिल्ह्यांतील योगप्रमुख उपस्थित होते.
या स्पर्धेत यजमान बेळगाव, धारवाड, बंगळूर, मंगळूर, उडपी, गुलबर्गा आणि म्हैसूर या जिल्ह्यांतील 180 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगा गाणीकोप्प यांनी केले, तर सुप्रीत गोटे यांनी आभार मानले.


Recent Comments