उद्या होणारा भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामनाच मुळात चुकीचा आहे, असे मत मंत्री एम.बी. पाटील यांनी व्यक्त केले. विजापूरमध्ये माध्यमांशी बोलताना ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बरसले.

“पाकिस्तानने आपल्या लोकांची अमानुषपणे हत्या केली आहे, त्यामुळे पाकिस्तानसोबतचे आपले संबंध पूर्णपणे तोडले पाहिजेत. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याला आमचा तीव्र विरोध आहे. जय किंवा पराजय ही दुसरी गोष्ट आहे, पण यांच्यासोबत सामना खेळायचाच कशाला? काश्मीरमध्ये त्यांनी आपल्या लोकांची हत्या केली आहे. त्या कुटुंबांना दु:ख होत नाही का? पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे चुकीचे आहे,” असे त्यांनी म्हटले.


Recent Comments