Belagavi

हिंदवाडीत पेव्हर ब्लॉकच्या कामाला सुरुवात

Share

बेळगावमधील वॉर्ड क्रमांक २९ च्या हिंदवाडी भागात पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे उद्घाटन नगरसेवक नितीन जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी ‘भंगी पॅसेज’ ऐवजी ‘सर्व्हिस रोड’ असे नाव वापरण्याची सूचना केली.

बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वॉर्ड क्रमांक २९ च्या हिंदवाडी भागातील तिसरा आणि चौथा क्रॉस, तसेच पाचव्या व सहाव्या क्रॉसच्या सर्व्हिस रोडवर पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली. सुरक्षित वाहतूक आणि पादचाऱ्यांच्या सोयीसाठी स्थानिक सुभाष मार्केटजवळ पूजा करून कामाचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना नगरसेवक नितीन जाधव यांनी नागरिकांना यापुढे या भागाला ‘भंगी पॅसेज’ ऐवजी ‘सर्व्हिस रोड’ या नावाने संबोधण्याची सूचना केली.

यावेळी अनेक नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.

Tags: