
स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत ‘ऑपरेशन मदत’ गट आणि कॅनरा बँकेच्या संयुक्त विद्यमाने एका चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावमधील अलतगा येथील खादीमशीन केएलपीएस स्कूल आणि आगसगा येथील एमएचपीएस स्कूलमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. कॅनरा बँकेचे महाव्यवस्थापक भास्कर चक्रवर्ती, जिल्हा मुख्याधिकारी प्रसाद घोळके आणि प्रादेशिक व्यवस्थापक प्रणव खडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.
स्पर्धेनंतर विजेत्या विद्यार्थ्यांना जीएम भास्कर चक्रवर्ती, एलडीएम प्रसाद घोळके, प्रणव खडे, राहुल पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका मालती कांबळे आणि चन्नव्वा शिगीहळ्ळी यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
‘ऑपरेशन मदत’ गट या अभियानांतर्गत स्वच्छता अभियान, चित्रकला स्पर्धा, कचरा गोळा करणे, प्लास्टिकचे वर्गीकरण आणि त्याचा पुनर्वापर असे विविध कार्यक्रम यशस्वीपणे राबवत आहे.
या कार्यक्रमाला शाळेचे कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments