Belagavi

इतरांच्या आवाहनाला बळी पडू नका, धर्म ‘हिंदू’ आणि जात ‘गाणीग’च लिहा

Share

जनगणना सर्वेक्षणादरम्यान गाणीग समाजाने इतरांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून, धर्माच्या कॉलममध्ये ‘हिंदू’ आणि जात व उपजातीच्या कॉलममध्ये ‘गाणीग’ असेच लिहावे, असे आवाहन गाणीग समाजाचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य रमेश उटगी यांनी केले.

बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, अखिल कर्नाटक गाणीग संघाच्या निर्देशानुसार, राष्ट्रीय कॉलममध्ये ‘भारतीय’, धर्माच्या कॉलममध्ये ‘हिंदू’, तर जात आणि उपजातीच्या कॉलममध्ये ‘गाणीग’ अशी नोंद करावी. सध्या सरकारी आणि खासगी शाळांचे शिक्षक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत, त्यामुळे नागरिकांनी योग्य कागदपत्रांसह अचूक माहिती द्यावी. असे केल्यास सरकारच्या शैक्षणिक आणि सामाजिक योजनांचा लाभ घेण्यास मदत होईल. वीरशैव लिंगायत समाजाच्या स्वामीजींच्या कार्यक्रमांना जा. पण सर्वेक्षणात जात मात्र गाणीगच लिहा, असे आवाहनही त्यांनी केले.

या पत्रकार परिषदेत प्रकाश बाळेकुंद्री, गंगाधर गिरिजन्नवर, अडिवेप्पा कोटी, फकीरप्पा गाणीगेर, अशोक गाणीगेर, जगदीश बिक्कन्नवर, बसवराज पोन्नन्नवर आणि मारुती मुडलगी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Tags: