Vijayapura

खासदार रमेश जिगजिणगी यांनी केली मंदिराची केली साफसफाई

Share

विजापूर शहर मंडलातर्फे ‘सेवा पंधरवडा’ अभियानांतर्गत आज सकाळी अदृष्ट लक्ष्मी मंदिरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी खासदार रमेश जिगजिणगी यांनी मंदिराच्या परिसरात झाडू घेऊन साफसफाई केली.

मंदिराच्या आवारातील कचरा साफ करून त्यांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानाला पाठिंबा दर्शविला.

माजी मंत्री अप्पासाहेब पट्टणशेट्टी, माजी विधानपरिषद सदस्य अरुण शहापूर, महानगरपालिकेचे महापौर एम.एस. करडी, तसेच नेते डॉ. सुरेश बिरादार यांनी खासदारांना या मोहिमेत साथ दिली.

यावेळी शहर मंडळ अध्यक्ष संदीप पाटील झळकी, बसवराज हळ्ळी, आनंद मुच्चंडी, चिन्नू चिनगुंडी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: