Belagavi

राजकारणामुळे सहकार क्षेत्र बिघडत आहे :आमदार भालचंद्र जारकीहोळी

Share

राजकारणामुळे सहकार क्षेत्र बिघडत आहे. निवडणूक म्हटल्यावर तमाशा आणि नाटके चालूच राहतात. लोक सगळ्यावर टाळ्या वाजवतात. मात्र, डिसिसी बँकेच्या निवडणुकीत १२ ठिकाणी आमचा विजय निश्चित आहे, असे आमदार भालचंद्र जारकीहोळी म्हणाले.

आज माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, डिसिसी बँक निवडणूक शक्य तितकी बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहोत. बिनविरोध न झाल्यास आम्ही बहुमत मिळवून निवडणूक जिंकू. १२ ठिकाणी आम्ही नक्कीच जिंकू आणि डिसिसी बँकेवर आमचे वर्चस्व प्रस्थापित करू, असे त्यांनी म्हटले.

हातामध्ये ‘लाँगू-मच्चू’ (लाठी-तलवार) घेतलेल्या प्रकरणाबद्दल बोलताना ते म्हणाले की, असे व्हायला नको होते. डिसिसी बँकेच्या निवडणुकीत यावेळी अशा घटना घडत आहेत. सहकार क्षेत्रात राजकारण नसावे, पण राजकारणामुळेच सर्व काही बिघडत आहे. हे सोडून शांततेत निवडणूक लढवावी, असे भालचंद्र जारकीहोळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “रमेश कत्ती यांच्या वक्तव्याला त्यांच्याच मतदारसंघात उत्तर देऊ. निवडणूक म्हटल्यावर तमाशा आणि नाटके चालूच राहतात. लोक सगळ्यावर टाळ्या वाजवतात.” आम्ही जास्त डोके लावत नाही, आमचे काम आम्ही करत राहू, असे भालचंद्र जारकीहोळी म्हणाले.

राजकारण म्हणजे डावपेच हे आलेच. मतदार जो निर्णय देतील, तो सर्वांना स्वीकारावाच लागेल. जिंकण्याची इच्छा सर्वांनाच आहे. लक्ष्मण सवदी तुमच्यासोबत आहेत की नाही, असे विचारले असता ते म्हणाले की, हे त्यांनाच विचारा. ‘अथणी’ आणि ‘कागवाड’च्या निवडणुका आम्ही लढवणार नाही, बिनविरोध निवड करणे त्यांच्यावर अवलंबून आहे, असे भालचंद्र जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

Tags: