Belagavi

बौद्ध गया पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्या…

Share

महाबोधी महाविहार, बौद्ध गया पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी आज बेळगावात भारतीय बौद्ध महासभेतर्फे आंदोलन करण्यात आले.

आज बुधवारी बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होऊन भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बिहारच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. जातीयवादी लोकांच्या ताब्यात असलेल्या बौद्ध गया येथील बुद्ध विहाराला मुक्त करावे. या मागणीसाठी देशभरात आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन अखंडपणे सुरू राहणार आहे, असे राष्ट्रीय समन्वयक मल्लेश चौगुले म्हणाले. ऑक्टोबरमध्ये पाटणा, बिहार आणि 12 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे देशव्यापी बुद्ध विहार मुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

बेळगाव जिल्हाध्यक्ष यमनप्पा गडिनायक म्हणाले, “बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी सातत्याने आंदोलन सुरू आहे. बौद्ध विहार ट्रस्ट रद्द करावा. फेब्रुवारीपासून हे आंदोलन सुरू असूनही सरकार याकडे लक्ष देत नाहीये. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील.”

 

Tags: