Belagavi

शहापूरमध्ये पीपीपी मॉडेलवर भाजी मार्केट, आमदार अभय पाटील यांचा पाहणी दौरा

Share

बेळगावमधील शहापूर येथील दाणे गल्ली परिसरात पीपीपी मॉडेलवर (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) भाजी मार्केट उभारण्याच्या उद्देशाने आमदार अभय पाटील, महापौर मंगेश पवार आणि महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी जागेची पाहणी केली.

यावेळी इन-न्यूजला माहिती देताना महापालिका आयुक्त शुभा बी. म्हणाल्या, “पीपीपी मॉडेलवर भाजी मार्केट उभारण्याची कल्पना आमदारांनी मांडली आहे. शासनाकडून परवानगी मिळताच, महानगरपालिकेच्या निधीचा वापर करून या प्रकल्पाचे काम सुरू केले जाईल आणि लवकरच त्याचे लोकार्पण केले जाईल.”

या प्रसंगी व्यापारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Tags: