इंडोनेशियातील जकार्ता येथे १० ते १५ सप्टेंबरदरम्यान झालेल्या आशियाई ज्युनिअर ज्युडो चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आहे. एकूण सहा पदके जिंकून भारताने दोन ‘ओव्हरऑल चॅम्पियनशिप’ किताबही पटकावले आहेत.

प्रशिक्षक रोहिणी पाटील, विवेक ठाकूर, गुनमणी आणि अमित विग यांच्या मार्गदर्शनाखाली युवा ज्युडोपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवले. या स्पर्धेत २० देशांमधील ३५० हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता.
५७ किलो वजनी गटात शाहिन आणि ६३ किलो वजनी गटात हिमांशी टोकास यांनी सुवर्णपदक मिळवले. ७८ किलो वजनी गटात इशरूप नारंगने रौप्यपदक जिंकले. तर, ६३ किलो वजनी गटात लिंथोई, ७० किलो वजनी गटात ताईबंगणबी आणि ७८ किलो वजनी गटात कंवरप्रीत कौर यांनी कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत भारतीय महिला संघाने पहिला ‘रनर-अप’ तर पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी मिळून दुसरा ‘रनर-अप’ म्हणून स्थान मिळवले.


Recent Comments