बेळगाव तालुक्यातील होनगा गावात अज्ञात व्यक्तींनी एका टाटा मॅजिक गाडीला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत जवळपास ५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

बेळगाव तालुक्यातील होनागा गावात अज्ञातांनी टाटा मॅजिक मंत्रा या वाहनाला आग लावल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, या आगीत वाहन पूर्णपणे जळून खाक झाले.
होनगा गावातील मातंगी गल्ली येथील सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या रेणुका दुंडप्पा राऊत यांच्या मालकीच्या या वाहनाला अज्ञात व्यक्तींनी आग लावली. या घटनेत अंदाजे ५ लाखांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. टाटा मॅजिक चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेच्या ठिकाणी सापडलेल्या मोबाईल फोनच्या आधारे पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.


Recent Comments