Dharwad

धारवाड कृषी महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मृत्यूचं सावट… प्रदर्शन पाहायला आलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू

Share

धारवाडच्या कृषी विद्यापीठात आजपासून चार दिवसांचा कृषी महोत्सव सुरू झाला आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी विद्यापीठाच्या आवारातच एक दुर्दैवी घटना घडली.

कृषी महोत्सवासाठी प्रदर्शनात दाखवण्यासाठी आणलेला एक मिनी ट्रॅक्टर थेट एका व्यक्तीवर उलटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा ट्रॅक्टर कॅंटर वाहनातून प्रदर्शन स्थळी आणण्यात आला होता. ट्रॅक्टर खाली उतरवण्याच्या प्रक्रियेदरम्यान नियंत्रण सुटले आणि तो व्यक्तीवर कोसळला.

या अपघातात तुमकूर येथील परशुराम एम. (वय ३२) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर उतरवत असताना अचानक नियंत्रण सुटल्याने तो थेट परशुराम यांच्या अंगावर पडला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे.

Tags: