विजापूर आणि महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे विजापूर जिल्ह्यातील डोणी नदीला पूर आला आहे.

ताळीकोटी शहरातून वाहणारी ही नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्यामुळे विजापूर-ताळीकोटी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
काही लोक तरीही धोकादायक पद्धतीने दुचाकी आणि ट्रॅक्टर पाण्यातून पुढे नेत आहेत. बस आणि कार नदीच्या काठावर अडकून पडल्या असून, लोकांना त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.


Recent Comments