Vijayapura

विजापूरच्या द्राक्ष उत्पादकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Share

विजापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेनेच्या नेतृत्वाखाली विजापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.

शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करत द्राक्ष उत्पादकांसाठी कोल्ड स्टोरेज उभारण्याची आणि सन २०२४-२५ सालातील पीक विम्याची रक्कम तातडीने वितरित करण्याची मागणी केली.

सन २०२४-२५ मध्ये हजारो शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता. परंतु अद्यापही त्यांना विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे पीक नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी, अन्यथा कृषी विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते संगमेश सागर यांनी दिला.

“अनेक महिन्यांपासून आम्ही पीक विम्याची वाट पाहत आहोत. अधिकाऱ्यांनी फक्त आश्वासन दिले आहे, पण कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. आम्हाला तातडीने मदत मिळाली नाही तर, आम्ही कृषी विभागाच्या कार्यालयासमोरच आंदोलन करू.” – असे ते म्हणाले.

Tags: