
बेळगाव उत्तर विभागातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन आपले क्रीडा कौशल्य दाखवले. खेळांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन यावेळी आमदार सेठ यांनी केले.

बेळगाव उत्तर विभागाचे आमदार आसिफ सेठ यांनी शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित तालुकास्तरीय विभागीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन केले.
या क्रीडा स्पर्धेत विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपल्यातील क्रीडा क्षमता दाखवली. ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये निरोगी स्पर्धात्मकता, सांघिक भावना आणि सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन देणारी ठरली.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना आमदार आसिफ सेठ म्हणाले की, ‘केवळ अभ्यासच नाही, तर खेळांमुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त शक्ती, शिस्त आणि शारीरिक तेज वाढीस लागते.’
ते पुढे म्हणाले की, ‘येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना चांगले क्रीडा साहित्य आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणखी प्रयत्न केले जातील. सरकारी शाळांमधील मुलांमध्ये दडलेल्या प्रतिभेला राष्ट्रीय पातळीवर चमकण्याची संधी मिळेल यासाठी योग्य ती पाऊले उचलली जातील,’ असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी शिक्षक, शिक्षण विभागाचे अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments