जिल्ह्यात डीसीसी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर कित्तूरमध्ये पीकेपीएसच्या सचिवाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. हा अपहरण करण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे.
डीसीसी बँक निवडणुकीचा जोर वाढत असताना, आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिव भीमप्पा यांच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. नानासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी पीकेपीएस सचिव भीमप्पा यांना पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या थार गाडीला अडवून थांबवले.
त्यानंतर पोलिसांनी सचिव भीमप्पा यांना ताब्यात घेतले. कित्तूर पीकेपीएसमध्ये भाजपची ८ सदस्यांची ताकद असून, काँग्रेसची ४ सदस्यांची ताकद असल्याची माहिती आहे. निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सचिवाच्या अपहरणाचा कट रचण्यात आल्याचे म्हटले जात आहे.


Recent Comments