प्रेषित महम्मद पैगंबर यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त १७ सप्टेंबर रोजी बेळगाव शहरात ‘मिलादे नबी’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे मुफ्ती मंजूर आलम मिझभाई यांनी सांगितले.

गुरुवारी बेळगाव शहरात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, १५०० व्या जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आणि समाजात शांततेचा संदेश देणारी संमेलने आयोजित केली जात आहेत. त्याचप्रमाणे, बेळगावातही मजलीस सुन्नद आणि अंजुमन इस्लाम यांच्या वतीने १७ सप्टेंबर, बुधवारी संध्याकाळी ५ वाजता अंजुमन मैदानावर या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
“प्रमुख पाहुणे म्हणून बिहारचे खासदार गुलाम रसूल बालियावी, कवी असद इक्बाल कलकतवी, माजी आमदार फिरोज सेत, आमदार राजू सेत यांच्यासह जिल्ह्यातील धर्मगुरू आणि मुफ्ती सहभागी होणार आहेत. या संमेलनात हजारो लोक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.” समाजातील सर्व लोकांनी या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन मुफ्ती मंजूर आलम मिझभाई यांनी केले.
यावेळी काझी नसरुल्ला, मौलाना साद अहमद हाश्मी, सोएब शाहपुरी, मौलाना सरवर, मौलाना अल्लाहुद्दीन कादरी, गुलाम रसूल, मौलाना असद आणि हाफीस अजर उपस्थित होते.


Recent Comments