Hukkeri

जिल्हा सहकारी बँक निवडणुकीमुळे हुक्केरी तालुक्यात चुरस

Share

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, हुक्केरी तालुका हा माजी खासदार रमेश कत्ती आणि मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे.

बेळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीमुळे हुक्केरी तालुक्यात कत्ती आणि जारकीहोळी यांच्यात जोरदार चुरस सुरू आहे. आज हुक्केरी तालुक्यातील यादगुड प्राथमिक सहकारी संस्थेच्या मतदान प्रतिनिधी निवड सभेमध्ये, जारकीहोळी गटाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने यादगुड प्राथमिक सहकारी संस्थेचे एक मत त्यांच्या पदरात पडले. आजच्या बैठकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक महांतेश बससापुरे आणि हसन मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Tags: