निपाणी तालुक्याच्या तवंदी घाटात एक कंटेनर वाहन उलटले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पुणे-बेंगळुरू महामार्गावर हा कंटेनर उलटला आहे. कंटेनरचा चालक बेळगाववरून कोल्हापूरकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर दरीत कोसळला. या भीषण अपघातातही चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही.
या घटनेमुळे मोठी जीवितहानी टळल्याने स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.


Recent Comments