Belagavi

बेळगाव जिल्हा दसरा जलतरण स्पर्धा उत्साहात संपन्न

Share

युवा सेवा आणि क्रीडा विभाग, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या वतीने बेळगावच्या गोआवेस येथील महानगरपालिका जलतरण तलावात आयोजित जिल्हास्तरीय दसरा जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या. या स्पर्धेत तनुज सिंग आणि वेदा खानोलकर यांनी वैयक्तिक चॅम्पियनशिप पुरस्कार जिंकला.

पुरुषांच्या गटात तनुज सिंग, तर महिलांच्या गटात वेदा खानोलकर यांनी वैयक्तिक चॅम्पियन पुरस्कार पटकावला. पुरुषांच्या गटात तनुज सिंगने ४ सुवर्णपदके, दर्शन वरूरने ३ सुवर्णपदके, स्वयं कारेकरने १ सुवर्ण आणि २ कांस्यपदके, अर्णव किल्लेकरने १ सुवर्ण आणि १ कांस्यपदक, आदि शिरसाटने ४ रौप्यपदके, स्मरण मंगळूरकर ने ३ रौप्य आणि १ कांस्यपदक, अभिनव देसाईने २ रौप्य आणि २ कांस्यपदके, तर मयूरेश जाधव, प्रजित मायेकर आणि सिद्धार्थ कुरुंदवाड यांनी प्रत्येकी १ कांस्यपदक जिंकले.

महिलांच्या गटात वेदा खानोलकर ने ५ सुवर्णपदके, श्रेष्ठा रोटीने २ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्यपदक, निधी मुच्चंडीने १ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्यपदके, मनस्वी मुच्चंडीने १ सुवर्ण आणि १ रौप्यपदक, प्रणाली जाधवने ३ रौप्य आणि १ कांस्यपदक, वैशाली घाटेगस्तीने २ रौप्य आणि २ कांस्यपदके, तर ओवी जाधवने २ कांस्यपदके मिळवली.

या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आबा हिंद स्पोर्ट्स क्लबचे एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, रणजित पाटील, संदीप मोहिते, शिवराज मोहिते, कल्लप्पा पाटील, विजय नायक, प्रांजल सुलधाल, शुभांगी मंगळूरकर, विजया शिरसाट, ज्योती पवार, वैभव खानोलकर, विशाल वेसणे, विजय बोगन, किशोर पाटील, मोहन पत्तार, ओम घाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: