धारवाडच्या सप्तापूर येथील एसटी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पायाभूत सुविधांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी त्यांनी अधिकारी आणि सरकारविरोधात आपला संताप व्यक्त केला.

एआयडीएसओ संघटनेच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. धारवाडमध्ये शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळाला तरी, राहण्यासाठी वसतिगृह मिळत नाही. वसतिगृह मिळाले तरी, तिथे चांगल्या सुविधा नसल्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.
सप्तापूर येथील एसटी मुलांच्या वसतिगृहात पायाभूत सुविधांचा अभाव, निकृष्ट दर्जाचे जेवण आणि स्वच्छतेची कमतरता आहे. या सर्व समस्यांमुळे विद्यार्थी त्रस्त झाले असून, या समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी त्यांनी केली आहे


Recent Comments