राज्यभरातील शेतीचे नुकसान आणि पावसाच्या हानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. या बैठकीबाबत जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी प्रसारमाध्यमांना अधिक माहिती दिली आहे.

जिल्हाधिकारी महंमद रोशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेळगाव जिल्ह्यात सुमारे ३० ते ३५ हजार हेक्टरवरील सोयाबीन पिकाला तीन वेगवेगळ्या प्रकारच्या किड्यांमुळे मोठा फटका बसला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल विभाग, कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी एकत्रितपणे सर्वेक्षण केले असून, सरकारकडे यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
सोमवारी बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी महंमद रोशन म्हणाले, “जिल्ह्यातील बलेहोनगल, नेसरगी, कित्तूर हुबळी आणि संपूर्ण मुरगोड हुबळी परिसरातील ३५ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात कीड लागल्यामुळे सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरस्थितीमुळे जिल्ह्यात एकूण ५० हजार हेक्टरवरील पिके नष्ट झाली असून, यात ३०,३०० हेक्टरवरील मूग आणि १० हजार हेक्टरवरील बागायती पिकांचा समावेश आहे.” अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.


Recent Comments