Chikkodi

डिसिसी बँकेच्या निवडणुकीत सहभागाची इच्छा नाही : आमदार दुर्याेधन ऐहाेळे

Share

आपल्याला सहकारी राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा नाही, असे स्पष्ट करत रायबागचे आमदार दुर्याेधन ऐहाेळे यांनी आपण आणि आपले कुटुंबीय बेळगाव डीसीसी बँकेची आगामी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले.

चिक्कोडी तालुक्यातील कुंगटोळी, करोशी आणि हत्तरवाट गावांमध्ये १.३० कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांना सुरुवात करताना ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, “माझ्या मुलांनीही निवडणूक लढवू नये, अशी माझी इच्छा आहे. डीसीसी बँकेच्या निवडणुकीबाबत ज्येष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल. आज रायबाग विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये रस्ते विकास कामांना सुरुवात झाली आहे. या भागातील लाेक अनेक दिवसांपासून ही मागणी करत हाेते, ती आज पूर्ण झाली आहे. कंत्राटदारांनी दर्जेदार काम करून नागरिकांना सहकार्य करावे.” असे आवाहन आमदार ऐहाेळे यांनी केले.

माजी जिल्हा परिषद सदस्य महेश भाते यांनी या कामांबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “करोशी जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील कुंगटोळी, करोशी आणि हत्तरवाट गावांमध्ये आमदार दुर्याेधन ऐहाेळे यांनी सुमारे १.३० कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांना सुरुवात केली आहे. या भागातील नागरिक नेहमीच आमदारांच्या पाठीशी राहतील.”

यावेळी सिद्धगौडा पाटील, हसन सनदी, मारुती हिरेकोडी, संतोष कामते, विजय कोठिवाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: