Belagavi

बेळगावात ट्रकच्या धडकेने सायकलस्वार ठार, संतप्त जमावाकडून चालकाला मारहाण

Share

बेळगाव तालुक्यातील बेनकनहळ्ळी गावात सोमवारी एका सायकलस्वार शेतकऱ्याला भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी ट्रकचालकाला पकडून बेदम मारहाण केली.

मल्लय्या पाटील असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर बेनकनहळ्ळी गावातील नागरिकांनी ट्रक चालकाला मारहाण करून ट्रकची तोडफोड केली. गावात येणाऱ्या गोदामाच्या ट्रक्सवर बंदी घालण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Tags: