Hukkeri

मंत्री सतीश जारकीहोळींच्या उपस्थितीत ‘पीकेपीएस’ सदस्याचे अपहरण

Share

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हुक्केरी तालुक्यातील मादिहळ्ळी गावात तणाव निर्माण झाला आहे. एका सदस्याचे थेट जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीतच अपहरण झाल्याचा आरोप आहे.

या घटनेमुळे रमेश कत्ती आणि सतीश जारकीहोळी यांच्या गटांमधील वाद विकोपाला पोहोचला आहे. मादिहळ्ळी गावातील प्राथमिक सहकारी संस्थेमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान हक्क देण्याबाबत बैठक सुरू होती. यावेळी दोन्ही गटांच्या सदस्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर, मंत्री सतीश जारकीहोळी तिथे दाखल झाले असतानाच एका सदस्याला जबरदस्तीने ओढून नेण्यात आले.

या घटनेनंतरही बैठक सुरू ठेवण्याचा प्रयत्न झाला, परंतु आवश्यक कोरम अभावी बैठक तहकूब करण्यात आली. निवडणुकीला अजून एक महिना बाकी असतानाच अशा घटना घडल्याने माजी खासदार रमेश कट्टी आणि मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यातील वाद कोणत्या पातळीवर पोहोचेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Tags: