

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील होसट्टी गावात शॉर्ट सर्किटमुळे १३ एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना अथणी तालुक्यातील होसट्टी गावात घडली आहे.

होसट्टी गावातील नायक शेतात ६ हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतातील १३ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सहा दशकांपूर्वी लावण्यात आलेले जुने विद्युत खांब आणि तारांच्या घर्षणातून ही आग लागल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी हेस्कॉम विभागावर संताप व्यक्त केला आहे.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, मात्र आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे त्यांना आग विझवता आली नाही. कापणीसाठी आलेला ऊस आगीमुळे पूर्णपणे जळून खाक झाला असून, विभागाच्या निष्काळजीपणामुळे हे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.


Recent Comments