निपाणी शहराबाहेरील पांगेर-बी रस्त्यालगत असलेल्या श्रीकृष्णनगरमधील नंदकुमार दशरथ जंभाले यांच्या भाड्याच्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या दुर्घटनेत सुमारे ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या घटनेत जंभाले यांच्या घरात असलेली १.५ लाख रुपयांची रोख रक्कम, दोन तोळे सोने-चांदीचे दागिने, टीव्ही, फ्रीज, सोफा आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या.
जंभाले पांडुरंग मोरे यांच्या घरात मजुरी करून राहत होते. दरम्यान, त्यांच्या घरात शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे घरात तात्काळ आग पसरली. आगीत जंभाले यांच्या घरातील सर्व साहित्य जळून गेले. अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे प्रयत्न केले.


Recent Comments