Accident

बेळगावात भीषण अपघात: कॅन्टर आणि बाईकच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

Share

कॅन्टर ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बेळगावमधील बसवेश्वर सर्कलजवळ गुरुवारी घडली.

मृत्युमुखी पडलेला दुचाकीस्वार बेळगाव शहरातील शास्त्री नगर येथील रहिवासी असल्याची ओळख पटली असून सुनील देसाई (वय ४७) असे त्याचे नाव आहे. आरपीडी सर्कलकडून बसवेश्वर सर्कलकडे अतिवेगाने येत असलेल्या कॅन्टर ट्रकने सुनील देसाई यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत सुनील यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दक्षिण वाहतूक पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Tags: