चिकोडी तालुक्यातील कब्बूर शहरात निप्पाणी -मुधोळ रस्त्यावर केएसआरटीसी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात इतका भीषण होता की, बस आणि ट्रक दोन्ही पूर्णपणे चक्काचूर झाले. ट्रकच्या आत अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी स्थानिकांना खूप प्रयत्न करावे लागले. बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून, त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच चिकोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, त्यांनी पाहणी केली आहे.


Recent Comments