श्री क्षेत्र धर्मस्थळचे धर्माधिकारी डॉ. वीरेंद्र हेगडे यांना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे मत व्यक्त करत त्यांना पाठिंबा देण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातून सुमारे एक लाख लोक जेडीएस पक्षाच्या माध्यमातून धर्मस्थळी जाणार असल्याची माहिती चिकोडी जिल्हा जेडीएसचे अध्यक्ष आणि माजी आमदार के. पी. मग्गेनवर यांनी दिली.

शुक्रवारी कागवाड येथील शिरुगुप्पी साखर कारखान्याच्या सभागृहात प्रसारमाध्यमांशी बोलताना मग्गेनवर यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, “जेडीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि केंद्रीय मंत्री कुमारस्वामी तसेच नेते निखिल कुमारस्वामी यांनी धर्मस्थळाबद्दल होत असलेल्या बदनामीचा आणि त्याची पवित्रता कमी करण्याच्या प्रयत्नांचा निषेध केला आहे.”
मग्गेनवर यांनी सांगितले की, “सोमवारी केंद्रीय मंत्री कुमारस्वामी आणि जेडीएसचे ज्येष्ठ नेते धर्मस्थळी येणार आहेत. बेळगावातून सुमारे एक लाख लोक, पक्षाच्या नेत्यांसोबत धर्मस्थळी पोहोचणार आहेत. त्यासाठी रविवारी सायंकाळी सर्व कार्यकर्ते बेळगावमध्ये एकत्र येऊन रात्रीच्या वेळी प्रवासाला सुरुवात करतील. सोमवारी सकाळी धर्मस्थळी पोहोचल्यानंतर मंजुनाथाचे दर्शन घेऊन डॉ. वीरेंद्र हेगडे यांची भेट घेऊन त्यांना धैर्य देणार आहोत,” असे ते म्हणाले.


Recent Comments