विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित न करता क्रीडावृत्ती जोपासावी, असे आवाहन पदवीपूर्व शिक्षण विभागाचे उपसंचालक पी. आय. भंडारी यांनी केले. हुक्केरी तालुका पदवीपूर्व शिक्षण विभाग आणि एस. के. पदवीपूर्व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २०२५-२६ च्या तालुकास्तरीय पदवीपूर्व महाविद्यालयांच्या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. क्रीडा ज्योत प्रज्वलित करून त्यांनी स्पर्धेला सुरुवात केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भंडारी म्हणाले, “विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडावृत्तीचा अंगीकार करून चांगली कामगिरी करावी.”

यावेळी मंचावर सी. एस. तुबाची शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. एस. आर. शेट्टी, सचिव पिंटू शेट्टी, क्रीडा समन्वयक अजये मोने, एम. आय. मठपती, मंगला हंदिगुंद, सी. आय. गंध, एस. बी. बुर्जी आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष ॲड. अनिल शेट्टी म्हणाले, “खेळामध्ये हार-जीत महत्त्वाची नसते, तर खेळातील सहभाग महत्त्वाचा असतो. खेळाडूंनी पंचांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे.”
दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत हुक्केरी तालुक्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. याप्रसंगी ओंकार हेद्दूरशेट्टी, एस. के. पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य एस. डी. बशेट्टी, शारीरिक शिक्षण प्राध्यापक बी. एल. नायक यांच्यासह संस्थेचे प्रशासकीय मंडळ सदस्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments