Chikkodi

येडूर येथील वीरभद्रेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले

Share

कृष्णा नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील येडूर येथील सुप्रसिद्ध वीरभद्रेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.

‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाणारे हे वीरभद्रेश्वर मंदिर कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेले होते. पण हळूहळू पाणी कमी झाल्यामुळे आता भाविकांसाठी दर्शनासाठी मंदिर खुले झाले आहे. सध्या भाविक मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेत आहेत.

अमावस्येच्या दिवशी वीरभद्रेश्वर मंदिर पाण्याखाली गेल्यामुळे भक्तांची निराशा झाली होती. पण आता मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत आहेत.

Tags: