बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात तिगडी क्रॉसजवळ आज सकाळी भीषण रस्ता अपघात झाला. सरकारी बस आणि टेम्पो यांच्यात झालेल्या या धडकेत १० ते १५ जण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघाताची तीव्रता इतकी होती की, काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर, स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन पुढील कार्यवाही सुरू केली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.


Recent Comments